dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मांडवा फाट्यावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

कारंजा : नागपूर–संभाजीनगर महामार्गावरील शेलूबाजार रस्त्यावरील मांडवा फाट्यावर बुधवार, २० मे रोजी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेलूबाजार रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक

कारंजा : नागपूर–संभाजीनगर महामार्गावरील शेलूबाजार रस्त्यावरील मांडवा फाट्यावर बुधवार, २० मे रोजी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात साहिल जितेंद्र उपाध्ये (वय २०, रा. वनोजा ता. मंगरुळपीर) व सागर अरविंद सोनुने (वय २२, रा. किन्हीराजा ता. मालेगाव) यांचा मृत्यू झाला. तर सतीश पंजाबराव ठाकरे (वय ३५, रा. वाई ता. कारंजा) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साहिल उपाध्ये व सतीश ठाकरे हे एका दुचाकीने शेलूबाजारहून वाईकडे जात होते. त्याचवेळी सागर सोनुने हा विरुद्ध दिशेने आपल्या गावी भरधाव वेगाने जात असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनचालकांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महादेव तांदळे व मुंगसाजी रुग्णवाहिकेचे चालक शुभम खोंड यांनी गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना कळविले. त्यानंतर त्यांनी व आई एकविरा रुग्णवाहिकेचे विनोद खोंड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव खडसे यांनी साहिल उपाध्ये व सागर सोनुने यांना तपासून मृत घोषित केले. तर गंभीर जखमी सतीश ठाकरे यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्यात आले.

दरम्यान, मृतक साहिल उपाध्ये व जखमी सतीश ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे कारंजा तालुकाध्यक्ष अमोल ठाकरे यांचे अनुक्रमे भाचा व भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच दोन्हीकडील नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top