dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रिसोडमध्ये वन उद्यानाला आग; मोठा अनर्थ टळला

रिसोड : शहरातील वन उद्यान परिसरात गुरुवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी या परिसरात येत असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास वन उद्यान परिसरातील गवत, झुडपे तसेच गायरान भागाला अचानक आग लागली. परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे व लहान रोपे असल्याने आग वेगाने पसरण्याची शक्यता होती. मात्र, ही घटना कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ नगरपरिषद व अग्निशामक दलाशी संपर्क साधला.  यानंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व शर्थीचे प्रयत्न करून साडेनऊ वाजेपर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. त्यामुळे संभाव्य मोठी हानी टळली. वन उद्यान परिसरात दररोज सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी येत असतात. सुदैवाने ही घटना गर्दी वाढण्यापूर्वी घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.  यावेळी घटनास्थळी पत्रकार संदीप पवार तसेच वृक्षमित्र गजानन मुलंगे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top