dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेगावात द बर्निंग ट्रॅव्हल्सचा थरार; शॉर्टसर्किटमुळे ट्रॅव्हल्स जळून खाक 

शेगाव : शेगाव कडून अकोल्याच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे धावत्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला. काही क्षणातच संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. ही घटना 20 मे रोजी सकाळी घडली. ट्रॅव्हल्स चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेतच बाहेर काढण्यात आल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेत ट्रॅव्हल्ससह प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.

        पुणे कडून प्रवाशांना घेऊन अकोला च्या दिशेने जाणारी  ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी 09 पीए 0271 ही 20 मे रोजी सकाळी आठ वाजे दरम्यान शेगाव येथे पोहोचली होती. शेगाव कडून अकोल्याच्या दिशेने प्रवास सुरू असताना शेगाव बाळापुर मार्गावर अचानक सदर ट्रॅव्हल्स मध्ये शॉर्टसर्किट होऊन ट्रॅव्हल्स ने पेट घेतल्याचे लक्षात आले. यावेळी ट्रॅव्हल्स मधील चालकाने  तातडीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. काही क्षणातच संपूर्ण ट्रॅव्हल आगीच्या भक्षस्थानी सापडली आणि बघता बघता ट्रॅव्हल्सचा कोळसा झाला. ट्रॅव्हल्सच्या आगीची माहिती मिळतात जवळच असलेल्या पारस अग्निशमन दल, शेगाव अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन ट्रॅव्हल्सला लागलेली आग विझवली मात्र तोपर्यंत संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली होती. घटनास्थळी पोलीस प्रशासन सुद्धा हजर झाले होते. काही काळ या मार्गावरील वाहतूक तपास झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top