कारंजा : शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत चोरीच्या संशयावरून ८ दुचाकी आणि १ ॲपे वाहन जप्त केले. या कारवाईत सुमारे ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, तीन संशयितांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी राहुल सोळंके, करण चव्हाण आणि चेतन पवार यांच्याकडून संबंधित वाहने ताब्यात घेतली. चौकशीदरम्यान वाहनांची वैध कागदपत्रे तसेच मालकी हक्क सिद्ध न झाल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२४ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या काही वाहनांचा संबंध अमरावती जिल्ह्यातील गुन्ह्यांशी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, पुढील तपासही वेगाने सुरू आहे.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये हिरो होंडा स्प्लेंडर, पॅशन प्रो, होंडा युनिकॉर्न, सीबी शाईन आदी दुचाकींसह एका ॲपे वाहनाचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार, पोलीस हवालदार गणेश जाधव, मयुरेश तिवारी, अजय धनकर, उमेशकुमार बिबेकर तसेच पोलीस कर्मचारी नितीन पाटील, अनिस निमसुरवाले, अमित भगत आणि मोहम्मद परसुवाले यांनी सहभाग घेतला.