dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

नीट’ पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून ९ दिवस कोठडी

लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे समोर येत असतानाच लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केली आहे. तो टोळीतला सक्रिय सदस्य असल्याचे समोर आले आहे.

लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. नीट परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचे समोर येत असतानाच लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केली आहे. तो टोळीतला सक्रिय सदस्य असल्याचे समोर आले आहे.

शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर विशेष सीबीआय कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली. अखेर सीबीआय कोर्टाने शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची कोठडी सुनावली आहे. शिवराज मोटेगावकर हे आरसीसी क्लासेसचे संचालक असून आता त्यांची सीबीआयमार्फत चौकशी केली जाणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरण केवळ राजयपूर्तेच मर्यादेत न राहता देशभरातील मोठे रॅकेट आहे. यात अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात प्राध्यापकांचा देखील समावेश आहे. यापूर्वी दोन प्राध्यापकांना सीबीआयने अटक केली होती. आता शिवराज मोटेगावकर यांना देखील अटक करण्यात आली आहे. कारण मोटेगावकर यांचे राज्यभरात नीट परीक्षेसंदर्भात मोठे क्लासेस आहेत. गेल्याच आठवड्यात मोटेगावकर यांचे ज्या-ज्या ठिकाणी क्लासेस आहेत त्या ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि काही इलेक्ट्रोनिक गॅझेट देखील सीबीआयने ताब्यात घेतली होती.

परीक्षेच्या 10 दिवस आधीच नीटची प्रश्नपत्रिका

देशभरात 3 मे रोजी नीटची परीक्षा होती. परीक्षेच्या 10 दिवस आधीच म्हणजे 23 एप्रिल रोजीच शिवराज मोटेगावकरने नीटची प्रश्नपत्रिका मिळवली होती. चौकशीत मोटेगावकरच्या मोबाइलमध्येच नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. शिवराज मोटेगावकरने विवेक पाटील नावाच्या एका व्यक्तीला तसेच विद्यार्थ्यांना नीटची प्रश्नपत्रिका पाठवली होती, मात्र तपास यंत्रणेसमोर तो सध्या लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास टाळाटाळ करत आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने परीक्षा संपल्यानंतर या प्रश्नपत्रिकेचे सर्व तांत्रिक पुरावे देखील नष्ट केले असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, हा डेटा तपास यंत्रणांनी रिकव्हर केल्याचे समजते. त्यामुळेच मोटेगावकर गोत्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना मोफत टेस्ट सीरिजचे आश्वासन

नीटचा पेपर फुटल्याचे समोर आले. त्यानंतर नीटची परीक्षा पुन्हा 3 मे रोजी होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अर्थातच एनटीएने जाहीर केले. ही नवी तारीख जाहीर होताच आरसीसीच्या शिवराज मोटेगावकरने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन योजना जाहीर केली होती. त्यानुसार तो आरसीसीच्या टॉप टेस्ट सीरिज विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देणार होता. तसा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. विशेष म्हणजे वन शॉट व्हिडिओ ही ऑनलाइन उपलब्ध करून देणार होता. विद्यार्थ्यांना 21 मे पासून हे सारे काही मोफत मिळणार होते. मात्र, त्याआधीच मोटेगावकर सीबीआयच्या रडारवर आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top