dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वऱ्हाडाच्या वाहनावर काळाचा घाला; 12 ठार: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघात 

मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धनिवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात झाला. आयशर टेम्पो आणि कंटेनर यांच्या जोरदार धडक झाली. ट्रकमध्ये शंभरपेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती आहे.

मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धनिवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोला भीषण अपघात झाला. आयशर टेम्पो आणि कंटेनर यांच्या जोरदार धडक झाली. ट्रकमध्ये शंभरपेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती आहे. आयशर ट्रक आणि कंटेनर जागेवरच पलटी झाला. या अपघातात जवळपास 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 ते 25 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले. 

बापूगाव खडकीपाडा येथील बाळाराम जयराम दांडेकर यांच्या साखरपुड्यासाठी हे वऱ्हाड धनिवारीकडे निघाले होते. आयशर टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच 50 पेक्षा जास्त वराडी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेग, अरुंद जागा आणि चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की काही प्रवासी वाहनाखाली अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. 

मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती 

अपघातातील सर्व जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे साखरपुड्याच्या घरात आनंदाऐवजी शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top