dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आंतरजिल्हा मोटारसायकल चोरट्यांचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद

वाशिम : स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने आंतरजिल्हा मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चार मोटारसायकली, एक टेम्पो, एक मोबाईल, रोख रक्कम व चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ३ लाख ५५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आसेगाव पोलिस ठाण्यात आतीष भगवान चवरे (रा. दस्तापूर, ता. मंगरूळपीर) यांनी त्यांच्या एमएच ३७ ए.के. ५३०३ क्रमांकाच्या होंडा शाईन मोटारसायकल चोरीची तक्रार दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १२ मे रोजी मानोरा तालुक्यातील साखरडोह येथून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आसेगाव, अकोट फेल (अकोला), दहीहांडा (अकोला), बोराखेडी (बुलढाणा) परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तसेच वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील पानटपरी फोडून रोख रक्कम चोरल्याची माहितीही समोर आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल राजेश भगत (रा. साखरडोह, ता. मानोरा), अजय भारत डाखोरे व योगेश पप्पू तायडे (दोघे रा. इंदिरा आवास, सोनगीरी झोपडपट्टी, बार्शीटाकळी, जि. अकोला) यांचा समावेश आहे. आरोपींना आसेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top