Miss India 2026 : गोव्याच्या साध्वी सतीश शैल हिला फेमिना मिस इंडिया २०२६ चा मुकुट प्रदान करण्यात आला आहे. मिस इंडिया बनण्यासाठी तिने इतर ३० स्पर्धकांवर मात केली. विजेत्याचे नाव जाहीर होताच, प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात साध्वीचे स्वागत केले.

मिस वर्ल्ड २०२७’ स्पर्धेत करेल भारताचे प्रतिनिधित्व
भुवनेश्वर (ओडिशा) : गोव्याच्या साध्वी सतीश शैल हिला फेमिना मिस इंडिया २०२६ चा मुकुट प्रदान करण्यात आला आहे. मिस इंडिया बनण्यासाठी तिने इतर ३० स्पर्धकांवर मात केली. विजेत्याचे नाव जाहीर होताच, प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात साध्वीचे स्वागत केले. आपल्या शालीनता, आत्मविश्वास आणि प्रभावी उपस्थितीने तिने परीक्षकांना प्रभावित करून हा मुकुट जिंकला. स्पर्धेच्या सर्व फेऱ्या जिंकून तिने आपल्या कुटुंबालाही गौरव मिळवून दिला आहे. आता ति ‘मिस वर्ल्ड २०२७’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल.
ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीमध्ये ६१ व्या फेमिना मिस इंडिया स्पर्धा घेण्यात आली. देशभरातून तीस स्पर्धकांनी यात भाग घेतला. महाअंतिम सोहळ्यात अनेक आव्हानात्मक फेऱ्या होत्या, ज्यात प्रत्येक स्पर्धकाला आपल्या आत्मविश्वासाने आणि उपस्थितीने प्रेक्षक आणि परीक्षक दोघांनाही प्रभावित करायचे होते. एका चुरशीच्या स्पर्धेनंतर, गोव्याच्या साध्वी सतीश सैलने सर्व फेऱ्या पार करून मिस इंडिया २०२६ चा किताब पटकावला. गेल्या वर्षीच्या विजेत्याने मंचावर साध्वीला ‘मिस इंडिया’ चा मुकुट घातला. या कार्यक्रमादरम्यान साध्वीच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसत होते. तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्र-मैत्रिणींनीही तिला प्रोत्साहन दिले.
साध्वी सतीश सैल मूळची गोव्याची आहे. तिने अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदवी मिळवली असून तिला सात भाषा अवगत आहेत. मिस इंडिया बनून तिने सिद्ध केले आहे, की ती केवळ सुंदरच नाही, तर खूप हुशारही आहे. ‘मिस इंडिया २०२६’ स्पर्धेची विजेती म्हणून साध्वीला मुकुट घातला गेला. महाराष्ट्राची राजनांदिनी पवार प्रथम उपविजेती ठरली तर दुसरी उपविजेती जम्मू-काश्मीरची श्री अद्वैता ठरली.


