6.8 percent polling in Akola in the first phase : विधानसभेसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात बुधवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ६.८ टक्के मतदान झाले.
अकोला : विधानसभेसाठी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात बुधवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ६.८ टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रावर अद्याप गर्दी दिसून येत नसली, तरी काही भागात मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे.
विधानसभेसाठी जिल्ह्यातील अकोट, मुर्तिजापूर, बाळापूर, अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघात बुधवारी सकाळी ७ वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ६.८ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मतदान केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. सकाळी १० वाजातनंतर जिल्ह्यातील मतदान केंद्राबाहेर मतदारांची गर्दी वाढायला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.
वाडेगाव, अकोला पश्मिममध्ये ईव्हीएममद्ये तांत्रिक बिघाड
पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात होताच जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील वाडेगाव तसेच अकोला पश्चिम मतदारसंघातील बी.आर.स्कूल या मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले होते. मतदान पथकातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरूस्ती केली. त्यामुळे काही वेळानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.