dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Buldhana voting: शेळके दाम्पत्यांनी केले मतदान ! जयश्री शेळके म्हणाल्या… ‘लोकशाहीच्या बाजूने मी मतदान केले ‘

Buldhana voting : बुलढाण्यात हुकुमशाही विरोधात लोकशाहीची लढाई असल्याची प्रतिक्रिया जयश्री शेळके यांनी दिली. विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर पाहायला मिळत असून, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे.

Buldhana voting

बुलढाणा :  बुलढाण्यात हुकुमशाही विरोधात लोकशाहीची लढाई असल्याची प्रतिक्रिया जयश्री शेळके यांनी दिली. विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर पाहायला मिळत असून, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. जिल्ह्यातील बहुचर्चित बुलढाणा मतदार संघात मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली असून, उमेदवारांपैकी महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांनी मतदानाचा हक्क बजावला. याप्रसंगी त्यांचे पती सुनील शेळके यांचीही उपस्थिती होती. त्यांचेही मतदान झाले.

मतदान पूर्ण केल्यानंतर, माध्यमांशी बोलताना जयश्री शेळके म्हणाल्या, बुलढाण्यात लोकशाहीचा विजय होणार असा विश्वास आहे. मी लोकशाहीच्या बाजूने मतदान केले असून, तुम्ही देखील मतदानासाठी बाहेर पण असे आवाहन त्यांनी केले. यंदा परिवर्तनाच्या माध्यमातून मतदार संघात इतिहास घडणार आहे असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बुलढाणा विधानसभा मतदारसंघावर लागले असून, महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जयश्री शेळके निवडणूक लढवीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आघाडी आणि युतीत सुरू असलेला जोरदार प्रचार आणि राजकीय चर्चा लक्षात घेता नेमका मतदारांचा कौल कुणाकडे जातो हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. मात्र, चूरशीच्या लढाईने मतदारांसह उमेदवारांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत. सकाळी सात ते नऊ दरम्यान बुलढाणा मतदार संघात ५.९१ टक्के मतदान पूर्ण झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top