dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

युवराज सामराची सर्वात कमी वयात शतकी खेळी : न्यूझीलंडविरुद्ध ५८ चेंडूंत शतक झळकावून मोडला जागतिक विक्रम 

चेन्नई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या ३१ व्या सामन्यात कॅनडाच्या १९ वर्षीय सलामीवीर युवराज सामराने तुफानी शतक झळकावून क्रिकेट विश्वाला थक्क केले. न्यूझीलंडविरुद्ध चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात युवराजने १२ वर्ष जुना जागतिक विक्रम ध्वस्त करत इतिहास रचला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने शानदार सुरुवात केली.

चेन्नई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या ३१ व्या सामन्यात कॅनडाच्या १९ वर्षीय सलामीवीर युवराज सामराने तुफानी शतक झळकावून क्रिकेट विश्वाला थक्क केले. न्यूझीलंडविरुद्ध चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात युवराजने १२ वर्ष जुना जागतिक विक्रम ध्वस्त करत इतिहास रचला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॅनडाने शानदार सुरुवात केली. सलामीवीर युवराज सामरा आणि कर्णधार दिलप्रीत बाजवाने तुफानी फलंदाजी करत अवघ्या ६ षटकांत ५० धावा उभारल्या. त्यानंतर १३ षटकांत शतकी भागीदारी पूर्ण करून स्कोअरबोर्डवर १०० धावा केल्या. १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर युवराजने चौकार मारत आपले वैयक्तिक शतक पूर्ण केले.

युवराज सामराने अवघ्या ५८ चेंडूंत शतक झळकावले. ६५ चेंडूंत ११ चौकार आणि ६ षटकारांसह ११० धावांची खेळी करत त्याने नाबाद राहून कॅनडाला १७३/४ अशी मजबूत धावसंख्या उभारून दिली. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच २० वर्षांखालील फलंदाजाने शतक झळकावले. युवराज आता टी-२० विश्वचषकात शतक करणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला आहे.

त्याने पाकिस्तानच्या अहमद शहजादचा २०१४ मधील विक्रम मोडला आहे. शहजादने २२ वर्ष १२७ दिवसांचा असताना बांगलादेशविरुद्ध शतक केले होते. युवराजने मात्र अवघ्या १९ वर्ष १४१ दिवसांत हा पराक्रम केला. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top