जालन्यात तरुणाला जीवंत जाळले; जिल्ह्यात खळबळ

जालना  :   एका 22 वर्षीय तरुणाचा जीवंत जाळून मारल्याची खळबळजनक घटना बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावात रविवार, 9 फेब्रुवारी रोजी  समोर आली.  

जालना  :   एका 22 वर्षीय तरुणाचा जीवंत जाळून मारल्याची खळबळजनक घटना बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावात रविवार, 9 फेब्रुवारी रोजी  समोर आली.  

       बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. आकाश बबनराव जाधव असे मयत तरुणाचे नाव आहे. आकाश हा तरुण नेहमीप्रमाणे  रात्री घराबाहेर झोपण्यासाठी गेला होता. रविवारी सकाळी त्याचे वडील बबनराव जाधव हे त्याला उठवण्यासाठी गेले असता तो त्याच्या झोपण्याच्या जागेवर दिसला नाही. त्यामुळे त्याचा आजूबाजूच्या लोकांनी परिसरात शोध घेतला असता तो काही अंतरावर असलेल्या एका शेततळ्यात जळलेल्या  अवस्थेत आढळून आला. आकाश याचा घातपात कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपीस शोधून त्याला जेरबंद करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मयत आकाश जाधव याच्या नातेवाईकांनी केली. आकाश जाधव याचा मृतदेह जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी बदनापूर ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुदाम भागवत यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहीती जानून घेतली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणासंदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह बदनापूर येथील पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »