अंगावर पेट्रोल टाकून तरुणाने स्वतःला पेटविले ; मृतदेह घेऊन नातेवाईक थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचले 

जालना : परतूर तालुक्यातील एका तरुणाने स्वतः च्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. यात छ्त्रपती संभाजीनगर तेथे उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 5 एप्रिल रोजी घडली. दरम्यान, या प्रकरणी परतूर पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही म्हणून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात आणला. यामुळे खळबळ उडाली होती. 

          वाटूर येथील प्रल्हाद शेषराव भागस या तरुणाने अंगावर पेट्रोल घेऊन स्वत: ला पेटवून घेतले होते. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपाचार सूरू त्याचा मृत्यू झाला. मात्र, या प्रकरणी परतूर पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही म्हणून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी दुपारी चार वाजता तरुणाचा मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका थेट पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आणून उभी केली. यावेळी पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिस आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी कारवाई करण्याची मागणी या तरुणाच्या नातेवाईकांनी केली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे हे पोलिसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळ दाखल झाले. सुरेश उनवणे यांनी मध्यस्थी करून नातेवाईकांना कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर

त्यानंतर पोलिसांनी स्वत: रुग्णवाहिकेत बसून तरूणाचा मृतदेह त्याच्या गावाकडे घेऊन गेले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »