dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाच्या जीवाला धोका?

बुलढाणा :  येथील आमदार संजय गायकवाड यांना अज्ञात व्यक्तीने एक पत्र पाठवले आहे. संजय गायकवाड यांच्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचा दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आता या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे. मात्र हे पत्र नेमके कोणी पाठवले? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

पत्रात नमुद करण्यात आले आहे की, ‘तुम्हाला पत्र लिहिण्याचे कारण की, तुम्हाला एक गोपनीय माहिती द्यायची आहे. तुमचे जुने सहकारी समाधान मोरे व त्यांचा भाचा रितेश खिल्लारे यांच्यामुळे तुमच्या धाकट्या मुलाला मृत्यूंजय गायकवाडच्या जीवाला धोका आहे. त्याला मारण्याची त्यांनी सुपारी बांधून घेतली असून ते त्या कार्यासाठी सक्रीय झाले आहेत. त्यांची अशी मिटिंग झाली आहे. तरी आपण व आपले कुंटुंब यांचे रक्षण करावे. मी त्याच्या जवळची व्यक्ती असून मी प्रकट स्वरूपात येऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर पाऊल उचलावे. वेळ निघून गेल्यावर काहीही उरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे. तुमचे आणि माझे ही. शिवरायांच्या चरणाची शपथ हा मजकूर खोटा नाही. आपण सतर्क राहावे.’

चौकशीची मागणी

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून त्यांच्या मुलाच्या जीवाला धोका असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करण्याची मागणी आ. संजय गायकवाड यांनी पोलिस महासंचालक आणि पोलिस अधिक्षक यांच्याकडे केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top