Armed robbery in Buldhana : बुलढाण्यातील सशस्त्र दरोड्यात महिला ठार; दरोडेखोर फरार

Armed robbery in Buldhana

Armed robbery in Buldhana : पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरम्यान झालेल्या झटापटीत, डॉक्टरांची पत्नी ठार झाली असून, स्वतः डॉक्टर गंभीर जखमी झाले. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे १९ जानेवारीच्या पहाटे ५ वाजे सुमारास उघडकीस आली.

Armed robbery in Buldhana

बुलढाणा: पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरम्यान झालेल्या झटापटीत, डॉक्टरांची पत्नी ठार झाली असून, स्वतः डॉक्टर गंभीर जखमी झाले. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे १९ जानेवारीच्या पहाटे ५ वाजे सुमारास उघडकीस आली.

दाभाडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी मध्यरात्री दरोडेखोर शिरले. घरातील मालमत्तेची लूट करीत असताना डॉक्टरांना जाग आली. यावेळी, डॉ. टेकाळे आणि त्यांच्या पत्नीने दरोडेखोरांना हटकले असता तीव्र झटापट झाली. यामध्येच, डॉक्टरांची पत्नी माधुरी टेकाळे ह्या ठार झाल्याचे समजते आहे. नेमके, दरोडेखोरांनीच त्यांचा खून केला का? याचा शोध पोलीस घेत आहेत. टेकाळे यांच्या शेजारी राहणारे त्यांचे नातेवाईक सकाळी दूध आणण्यासाठी गेले असता दोघे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. यानंतर, या गंभीर घटनेची माहिती गावात पसरली. स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. शिवाय श्वान पथक देखील, घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. दरोडेखोरांनी घरातील कपाट तोडून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या घटनेत गंभीर जखमी झालेले गजानन टेकाळे यांच्यावर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात सततच्या गंभीर घटनांनी खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसात खूणाची ही तिसरी घटना असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवून, तातडीने आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

मुलीचा जीव वाचला!

घटने दरम्यान, डॉक्टरांची मुलगी सहलीला गेली असल्याने अनर्थ टळला. अन्यथा, या झटापटीत मुलीलाही जैविक हानी झाली असती. मुलगी घरी नसल्याने तिचा जीव वाचला, असे परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »