बुलढाणा : राज्यात सर्वत्र बैलपोळा साजरा होत आहे.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी कामे केली जातात. आधुनिक कृषी क्षेत्रात बैलांची आणि ट्रॅक्टर यांची उपयोगिता सारखीच असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव ट्रॅक्टर चालवत सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो. शेतकऱ्याकडील बैल जोड्यांची संख्या कमी झाली आहे. शेतीच्या कामात आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामे केले जातात. त्यामुळे पोळ्या सारखे सण उत्सव हे पुढेही कायम राहावे या दृष्टिकोनातून मेहकर येथे शेतकरी बांधवांच्यावतीने मेहकर शहरातील मुख्य मार्गाने ट्रॅक्टर पोळ्याची मिरवणूक काढण्यात आली. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास 150 ते 200 ट्रॅक्टर सहभागी झाले होते. जे वर्षभर आपल्या बळीराजा करिता शेतात सर्जा राजाच्या बरोबरीने आजच्या आधुनिक युगात योगदान देत असतात असे ट्रॅक्टर देखील आज आपल्याला शहरातील रस्त्यावर दिसुन आले…या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, तालुकाप्रमुख सुरेश वाळुकर, शहर प्रमुख जयचंद भाटिया यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते .