पत्रकारांसाठी भव्य ‘पत्रकार भवन’ उभारणार : माजी आ. चंद्रकांत दानवे

भोकरदन : पत्रकारांच्या हक्कासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरच शहरात भव्य ‘पत्रकार भवन’ उभारणार असल्याची घोषणा माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केली. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ पत्राच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जाणारा ‘पत्रकार दिन’ भोकरदन शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भोकरदन मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शहरातील रत्नमाला लॉन्सच्या सभागृहात मंगळवार, 6 जानेवारी रोजी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख इरफान यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे सचिव सांडू नामदे, कार्याध्यक्ष संजय पैठणकर, उपाध्यक्ष अमोल शिंदे, इम्रान खान यांच्यासह विजय सोनवणे, नानासाहेब वानखेडे, रवींद्र देशपांडे, सुनील जाधव, दीपक सोळंके, रमेश इंगळे, तुषार पाटील, वैभव सोनवणे, विलास खांडवे, युवराज पगारे, सुरेश शेळके, सुरेश गिराम, शेख सलीम, प्रताप साळवे, विश्वास ढसाळ, कमलकिशोर जोगदंडे, अमित लोहाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. भोकरदन नगरपरिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्षा मिर्झा सिमरन नाज वसीम यांच्या वतीने शहरातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सर्व पत्रकारांना पेन, डायरी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शमीम मिर्झा, महेश औटी, शफीक पठाण, आमेर पठाण, कदीर बापू, जहीर कुरेशी, अझहर शाह, नसीम पठाण, चंद्रकांत पगारे, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नवनिर्वाचित नगरसेवक भूषण शर्मा व सुमित थारेवाल यांनी आपल्या कार्यालयात पत्रकारांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ, पेन आणि डायरी देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला मनोज थारेवाल, पप्पू थारेवाल, गणेश दौड, जब्बार भाई, राहुल आक्से, स्वप्नील शर्मा, सागर शर्मा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »