Manoj Jarange’s public meeting in Vaijapur:जे लोकसभेला सांगितलं होतं तेच विधानसभेला सांगतोय ‘पाडा ‘ –  मनोज जरांगे

Manoj Jarange’s public meeting in Vaijapur:जे लोकसभेला सांगितलं होतं, तेच विधानसभेला सांगतोय की पाडा असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मतदारांना केले आहे. 

वैजापूर  : जे लोकसभेला सांगितलं होतं, तेच विधानसभेला सांगतोय की पाडा असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मतदारांना केले आहे. तसेच माझ्या नावाचा व फोटोचा वापर करून वापर करून कुणी मत मागत असेल तर माझा नाईलाज असल्याचं देखील ते म्हणाले. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे शनिवार, 16 नोव्हेंबर रोजी येवला दौऱ्यावर असताना वैजापूर येथे आले होते.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून वैजापूर मतदारसंघात जरांगे यांच्या नावाचा वापर करून काही राजकीय नेते राजकीय भांडवल करत असल्याची बाब समोर आली होती. यावर जरांगे पाटील यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. जे मी लोकसभेला सांगितलं होते तेच विधानसभेला सांगतोय की पाडा म्हणून राज्यात कुणालाही पाठींबा नसून काही लोक बळजबरीने माझ्या नावाचा व फोटोचा वापर करतात त्याला माझा नाईलाज असल्याचं ते म्हणाले.  मला राजकारणापेक्षा माझ्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कुणी माझे कितीही रिल्स व्हायरल केले. कुणी कितीही फोटो वापरले तरी माझा समाज मात्र हुशार असल्यास ते म्हणाले. त्यामुळे माझा समाज बरोबर करतो.

दरम्यान, जे मी लोकसभेला म्हणालो होतो, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आना. तेच मी विधानसभेला सांगितलं असल्याचं जरांगे  म्हणाले. तसेच मराठा समाजाला एकच सांगणे आहे तुमचं मत वाया जाऊ देऊ नका. तुम्हाला अडीअडचणीत मदत करणाऱ्या उमेदवारालाच तुम्ही मदत करा असं देखील ते म्हणाले.जरांगे यांचा रोख साहजीकच महायुतीचे उमेदवार पाडण्याकडे असल्याचे दिसून येते. त्यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी लोकसभा निवडणुकी प्रमाणे याचा अर्थ सर्वांनी समजून घेतला आहे.अशी प्रतीक्रीया व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »