dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है? गाण्याची आठवण, पोस्टरवरून बुलढाण्यात राडा! 

बुलढाणा :  मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? या प्रसिद्ध हिंदी गीताची आठवण करून देणारी घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. ‘इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे’ असे राजकीय समीकरण मागील काही दिवसांपासून दिसून येत असताना, वाढदिवसानिमित्त पोस्टर लावल्याच्या कारणावरून झालेला वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे दिसून आले. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात शुभेच्छांचे पोस्टर लावण्यावरून मध्यरात्री  वाद झाला.

जिल्ह्यात पुन्हा भाजप – सेना संघर्षाची  ठिणगी 

बुलढाणा :  मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? या प्रसिद्ध हिंदी गीताची आठवण करून देणारी घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. ‘इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे’ असे राजकीय समीकरण मागील काही दिवसांपासून दिसून येत असताना, वाढदिवसानिमित्त पोस्टर लावल्याच्या कारणावरून झालेला वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे दिसून आले. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात शुभेच्छांचे पोस्टर लावण्यावरून मध्यरात्री  वाद झाला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी विक्की आव्हाड आणि त्याच्यासोबतच्या सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीवरून, विद्याधर महाले मित्रमंडळाचे सदस्य मंदार बाहेकर हे प्रमोद गावंडे, मुन्नाभाऊ बँडवाल, कौस्तुभ पाटील आणि मजुरांसह ३० ऑगस्टच्या मध्यरात्री साडेबारा वाजता जयस्तंभ चौकातील गांधी भवनासमोर पोस्टर लावत होते. नगर परिषदेची परवानगी घेऊन हे काम सुरू असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याचवेळी एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायरमधून तीन ते चार जण उतरले. दुसऱ्या बाजूने विक्की आव्हाड आणि त्याच्यासोबत आणखी तीन ते चार अनोळखी व्यक्ती तेथे आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. “तुम्ही पोस्टर कसे लावता?” असा जाब विचारत त्यांनी अश्लील शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि कार्यकर्ते व मजुरांना पोस्टर लावण्यापासून रोखल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन वाघमोडे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top