dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

वाशिम जिल्ह्याचा 91.15% निकाल; मुलींचा वरचष्मा

वाशिम : जिल्ह्याचा यंदाचा शैक्षणिक निकाल 91.15 टक्के लागला असून अमरावती विभागात दुसरा क्रमांक पटकवला. विशेष म्हणजे यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांच्या तुलनेत अधिक टक्केवारी मिळवली आहे.

जिल्हा अमरावती विभागात दुसरा, जिल्ह्यात वाशिम तालुका अव्वल 

वाशिम : जिल्ह्याचा यंदाचा शैक्षणिक निकाल 91.15 टक्के लागला असून अमरावती विभागात दुसरा क्रमांक पटकवला. विशेष म्हणजे यंदाही मुलींनी बाजी मारत मुलांच्या तुलनेत अधिक टक्केवारी मिळवली आहे. आकडेवारीनुसार मुलींचा निकाल लक्षणीयरीत्या अधिक असल्याने त्यांच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा ट्रेंड कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुकानिहाय निकालाचा आढावा घेतला असता, वाशिम तालुका 92.66 टक्क्यांसह आघाडीवर राहिला. मालेगाव (92.98%) आणि रिसोड (91.99%) यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याच्या सरासरीत भरीव योगदान दिले, तर कारंजा तालुक्याने 91.34 टक्के निकालासह स्थिर कामगिरी नोंदवली. मात्र, काही तालुक्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी निकाल लागल्याचे दिसून आले. मंगरुळपीर तालुक्याचा निकाल 88.58 टक्के नोंदवला गेला, तर मानोरा तालुका 84.84 टक्क्यांसह जिल्ह्यात सर्वात मागे राहिला असून या तालुक्यांमध्ये गुणवत्तावाढीसाठी विशेष उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात एकूण 21,406 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 19,361 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचा निकाल 89.17 टक्के, तर मुलींचा निकाल 93.92 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील एकत्रित निकाल 90.92 टक्के लागला असून एकूण 1,48,931 विद्यार्थ्यांपैकी 1,34,352 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात मुलांचा निकाल 88.29 टक्के, तर मुलींचा निकाल 93.95 टक्के इतका आहे. या निकालातून शैक्षणिक क्षेत्रात सातत्य आणि स्थिरता दिसून येत असली तरी तालुकानिहाय असमतोल कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कमी निकाल असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत असून आगामी शैक्षणिक वर्षात गुणवत्तावाढीसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top