मलकापूर : शहरातील ओंकारेश्वर नगर परिसरातील नुकतेच बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने निकालाच्या पुर्वसंध्येला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 1 मे रोजी उघडकीस आली. या घटनेची वार्ता परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओंकारेश्वर नगर येथे राहणारे संजय राणे व त्यांची पत्नी हे दोघेही शिक्षक आहेत. 1 मे रोजी ते सकाळी शाळेत गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा साहिल घरी एकटाच होता. काही वेळाने दोघे घरी परतले असता साहिल दरवाजा उघडत नसल्याने संशय निर्माण झाला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, साहिलने घरातील पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. साहिल हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. अभ्यासू, शांत व मनमिळाऊ स्वभावामुळे तो सर्वांच्या ओळखीचा होता. अशा गुणी विद्यार्थ्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करून संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करत आहेत.