dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

महिलांसह गावकऱ्यांचा खामगावात ग्रामीण पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन | protest at rural police station in Khamgaon

protest at rural police station in Khamgaon : पारखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा फलकाची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीला घेऊन गावातील महिला व नागरिकांनी 20 एप्रिल रोजी दुपारी ग्रामीण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

तात्काळ आरोपींना अटक करण्याची केली मागणी 

खामगाव :  पारखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा फलकाची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीला घेऊन गावातील महिला व नागरिकांनी 20 एप्रिल रोजी दुपारी ग्रामीण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले.

        तालुक्यातील पारखेड येथे 16 एप्रिल रोजी गावातील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या शुभेच्छा फलकाची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली होती. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी समाज बांधवांनी तीर्व संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात समाजकंटकांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र चार दिवस उलटून सुद्धा पोलिसांकडून आरोपींचा छडा लावण्यात आलेला नसून चौकशीमध्ये दिरंगाई करत असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त करत समाज बांधवांनी 20 एप्रिल रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनवर तडक देत तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या मागणीला धरून ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत ठीक आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी आंदोलक महिला आणि नागरिकांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top