dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अनुज तारे यांची बदली; वाशिमचे नवे एसपी राजकुमार शिंदे : Anuj Tare transferred

Anuj Tare transferred : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी राजकुमार शिंदे यांची नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने याबाबतचा अधिकृत आदेश सोमवारी जारी केला.

वाशिम :  जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी राजकुमार शिंदे यांची नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने याबाबतचा अधिकृत आदेश सोमवारी जारी केला.

शासन आदेशानुसार, सध्या पुणे येथे पोलीस उपआयुक्त पदावर कार्यरत असलेले राजकुमार शिंदे यांची बदली करून वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पदस्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यमान पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या बदलीमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात बदल झाला असून, त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते. आता नव्या एसपींकडूनही गुन्हेगारी नियंत्रण, अवैध धंदे बंद करणे, वाहतूक व्यवस्थापन आणि जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्यभरातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देशही आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top