कन्नड तालुक्यातील मोहरा येथे विविध विकास कामांना सुरुवात

नाचनवेल :  कन्नड तालुक्यातील मोहरा येथे विविध विकास कामांना मंगळवार, 30 डिसेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरतसिंग राजपूत यांच्या हस्ते विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

नाचनवेल :  कन्नड तालुक्यातील मोहरा येथे विविध विकास कामांना मंगळवार, 30 डिसेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरतसिंग राजपूत यांच्या हस्ते विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

मोहरा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण करण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्‌ल ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने भरतसिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मातोश्री पानंद शेत रस्ते, मारुती मंदिर ते राजेंद्र जयस्वाल यांचे शेतापर्यंत खडीकरण मजबुतीकरण करणे, भिकन गोराडे यांच्या शेत ते अप्पा सपकाळ यांच्या शेतापर्यंत, राजपूत वाडी ते डोंगरा पर्यंत, शेती वस्ती ते गोराडे वस्ती, शंकर गाडेकर यांचे शेत ते डोंगरापर्यंत, रोड ते शेषराव फौजी यांच्या शेतापर्यंत, रामेश्वर कडूबा गाडेकर यांचे घर ते विठ्ठल रुक्माई नगर, सोमीनाथ फकीरराव गाडेकर यांचे शेत ते टकले वस्ती इत्यादी विविध मातोश्री पानंद रस्ते या रस्त्यांचे विकास कामांना यावेळी प्रारंभ करण्यात आला. यापैकी काही रस्त्यांचे काम झाले असून काही चे प्रगतीपथावर आहे, तर काहींचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे भरतसिंग राजपूत यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास मोहरा गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, पत्रकार यांच्यासह गामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अरमान मतदार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शेळके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »