dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मंत्री सावेंच्या गाडीवर फेकले काळे,खा.कराडांना घेराव; तिकिट नाकारलेल्या भाजपा इच्छुकांचा राडा  

छत्रपती संभाजीनगर :  शिवसेना-भाजपाची युती तुटल्यानंतर सर्वच इच्छुकांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अद्यापही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीतील ड्रामेबाजी संपायला तयार नाही. बुधवार, 31 डिसेंबर रोजी शहरातील भाजपा प्रचार कार्यालयासमोर पक्षाने तिकिट नाकारलेल्या नाराज इच्छुकांनी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर काळे फेकले तर खा. डॉ.भागवत कराड यांची गाडी आडवून त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. 

शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा प्रभाग क्रमांक 22 भाजपाला देण्याचा डाव फसल्यानंतर सेनेतील अंतर्गत वाद संपुष्टात आला. आता उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपातील वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपाने सागर पाले यांना उमेदवारी दिली आहे. त्या ठिकाणी इच्छुक असलेले प्रशांत भदणे यांनी सर्व्हेत आपण पुढे असतांना मंत्री अतुल सावे आणि खा.डॉ.भागवत कराड यांनी जातीयवाद करीत आपल्या समर्थकांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला आहे. बुधवारी भदणे दाम्पत्यांसह काही कार्यकर्त्यांनी भाजपाच्या  प्रचार कार्यालयासमोर या दोन्ही लोकप्रतिनिधींची वाहने अडवली. त्यांना घेराव घालून समोरासमोर जातीयवादाचा आरोप केला. आपण 25 वर्ष पक्षासाठी झटलो, कोरोना काळात 10 हजार मास्क वाटले, पक्षासाठी अन्नाच्या किट तयार करून दिल्या, महापालिकेत तिकिट मिळेल या अपेक्षेने नेत्यांवर लाखोंचा खर्च केला मात्र या लोकांनी ऐनवेळी धोका दिल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान मंत्री सावे आणि खा. कराड यांच्या वाहनांना कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याची माहिती मिळताच  पोलिसांनी धाव घेत या दोन्ही नेत्यांच्या गाड्या सुरक्षाकडे करून बाहेर काढल्या. त्यानंतर आमदार संजय काणेकर घटनास्थळी पोहोचले त्यांनी इच्छुक उमेदवार प्रशांत भदाणे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

जनसुराज्य आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष 

मराठा समाजातील इच्छुकांवर अन्याय झाला तर छत्रपती जनसुराज्य आघाडी त्यांना सहकार्य करील असा दावा मराठा समाजाच्या विविध संघटनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन केला होता. मनपा निवडणुकीत अनेक ठिकाणी सर्वच पक्षांनी मराठा समाजाच्या इच्छुकांवर अन्याय केला आहे. प्रशांत भदणे यांनी थेट जातीयवादाचा आरोप करून ही बाब समोर आणली आहे. त्यामुळे छत्रपती जनसुराज्य आघाडी या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top