dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गंगाखेड नगरपालिकेच्या गटनेतेपदी संदीप सानप यांची निवड

परभणी :  गंगाखेड नगरपालिकेच्या भाजप गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेवक संदीप सानप यांची निवड बुधवार, 31 जानेवारी रोजी करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत संदीप सानप हे प्रभाग क्रमांक 12 मधून विजयी झाले आहेत. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी संदीप सानप यांची निवड केली.

नगरपालिकेच्या गट नेतेपदी निवड झाल्याबद्ल संदीप सानप यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाचे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस आकाश लोहट, राज्य कार्यकारणी सदस्य लिंबाजी टोले, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष भरत जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप गिराम, भाजपा तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास फड, जिल्हा सचिव भाजप अमोल सानप, सरपंच प्रदीप मुंडे, जिल्ह्याचे सचिव निवृत्ती रेड्डी यांची उपस्थिती होती. गट नेतेपदी निवड झाल्याबद्दल संदीप सानप यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. गंगाखेड शहराच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे संदीप सानप यांनी निवडीनंतर सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top