Unnatural abuse of a friend by a lustful youth: जळगाव जामोद पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात २३ वर्षीय तरुणावर त्याच्याच एका २७ वर्षीय मित्राने अनैसर्गिक अत्याचार केल्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सुमारे वर्षभर सुरू असलेल्या या छळाला कंटाळून पिडीत युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर हे प्रकरण समाेर आले.
जळगांव जामोद (जि. बुलढाणा) : जळगाव जामोद पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या भेंडवळ येथील एका २३ वर्षीय तरुणावर त्याच्याच एका मित्राने (२७ वर्ष) सुमारे एक वर्ष अनैसर्गिक अत्याचार केल्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या छळाला कंटाळून पीडित युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर हा प्रकार समाेर आला. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका २३ वर्षीय युवकावर त्याच्याच मित्राने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २ एप्रिल रोजी पीडित युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर उघडकीस आली. विष प्राशनानंतर युवकाला अकोल्यातील सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे वर्षभर सुरू असलेल्या अत्याचाराला कंटाळून युवकाने हे पाऊल उचलल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. यावरून पोलिसांनी आरोपी मित्रावरूद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी युवक पसार
मित्राने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्यापासून आरोपी मित्र पसार झाल्याची माहिती आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी देवराम गवळी करीत आहेत.