dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचा एकत्रीत लढा उभारण्याची गरज’; शिक्षक भारतीचे राज्य संघटक सुरेश देवकर यांचे प्रतिपादन 

बुलढाणा : शिक्षकांच्या सामान्य प्रश्नांची सोडवणूक  जिल्हास्तर तसेच विभागीय पातळीवर होऊ शकते. अंशत: अनुदानित शाळांना वाढीव टप्पा प्राप्त करण्यासाठी राज्याच्या आर्थिक बजेटमध्ये  वेतन लेखाशीर्ष  अंतर्गत  वित्त विभागाकडून आर्थिक तरतूद मंजूर करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगून 1 नोव्हेबर 2005 नंतर सेवेत नियुक्त सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शिक्षकांचा एकत्रित लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षक भारतीचे राज्य संघटक सुरेश देवकर यांनी केले.

संतनगरी शेगाव येथील मधुरा लॉन्स येथे 25 एप्रिल रोजी आयोजित शिक्षकांच्या तालुकास्तरीय सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी विचारपिठावर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक खोरखडे, प्रा.राजू वैद्य, शेगाव तालुकाध्यक्ष नितीन वाढे,  जिल्हा संघटक विजय नारखेडे,   माजी मुख्याध्यापक विलास मसने , दिपक लमक,  निळकंठ धुमाळे, डि. आर. गावंडे, समाधान भारसाखळे  यांची प्रमुख उपस्थिती होती.सभेचे प्रास्तविक प्रा. अशोक खोरखडे यांनी केले. तत्पूर्वी राज्य संघटक सुरेश देवकर यांच्या आदेशानुसार शिक्षक भारती  तालुका अध्यक्षपदी  महात्मा फुले विद्यालयातील सहा. शिक्षक नितीन संतोष वाढे तर बुलढाणा जिल्हा संघटकपदी रामकृष्ण पाटील विद्यालय, बोरी आडगावचे विजय नारखडे  यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सुरेश देवकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सभेला सर्वश्री शिक्षक मदन जाधव,  विजय सावळे, नितीन लवंगे, हरीश चिंचोळकर, नितीन पांडे,  असंबे, गणेश भटकर, उमेश मसने, सचिन धनोकार, कडुकार, सिरसाट, कलोरे, देशमुख यांच्यासह बहुसंख्येने शिक्षकांची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top