छत्रपती संभाजीनगर : अग्रवाल समाजाचे कुलपिता, सत्य, अहिंसा व समाजवादाचे प्रणेता छत्रपती महाराजा अग्रसेन यांची जयंती सोमवार, 22 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त अग्रवाल सभेच्या वतीने शहरात एकता वाहन रॅलीचे अयोजन करण्यात आले असल्याची माहिती अग्रवाल महासभेचे अध्यक्ष कुंजबिहारी अग्रवाल यांनी दिली.

सोमवारी वाहन रॅलीला दुपारी अडीच वाजता शहागंज येथील महात्मा गांधी पुतळा चौकातून सुरुवात होईल. महाराजांची चांदीची मूर्ती सर्वांचे आकर्षण असणार आहे. मान्यवरांच्या हस्ते मूर्तीला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात होईल. सिटी चौक, गुलमंडी, पैठण गेट, क्रांती चौक मार्गे जालना रोड, अग्रसेन चौक येथे पोहोचेल. स्तंभाच्या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत शोभायात्रेला सुरुवात होईल. कॅनॉट प्लेस मार्गे शोभायात्रा सिडकोतील अग्रसेन भवनात पोहोचेल. सायंकाळी ६:४५ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्रमुख पाहुणे म्हणून एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे व अग्रवाल समाजाचे ज्येष्ठ नागरिक श्रीकृष्ण साता यांची उपस्थिती राहणार आहे. अग्रसेन महाराजांची आरती व मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात येईल. एकता वाहन रॅलीत सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महासभेचे अध्यक्ष कुंजबिहारी अग्रवाल यांनी केले आहे.