माहोरा : जाफ्राबाद पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये तब्बल १३ वर्षांपूर्वी चोरीस गेलेली मोटारसायकल तसेच एका वर्षापूर्वी चोरी झालेली दुसरी मोटारसायकल जप्त केली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जाफ्राबाद येथील हॉटेल मॉडर्न समोर पोलिसांनी नाकाबंदी केली असता, गजानन मोहन वाघ (४२ वर्षे) रा. टाकळी, ता. जाफ्राबाद, जिल्हा. जालना हा एका हिरो कंपनीच्या फॅशन प्रो मोटारसायकलवर आढळला. वाहनाचा मालकी हक्क विचारल्यावर तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही.
तपासाअंती ही मोटारसायकल मलकापूर, जिल्हा. बुलढाणा पोलीस स्टेशन येथे ०२ जून २०१३ रोजी दाखल गुन्ह्यातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. तब्बल १३ वर्षांनंतर ही चोरीची मोटारसायकल पोलिसांच्या हाती लागली आहे.
दुसऱ्या कारवाईत नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी अब्दुल गफ्फार सत्तार कुरेशी रा. जाफ्राबाद याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील होंडा शाइन मोटारसायकलची तपासणी केली असता चेसिस क्रमांक खोडलेला तर इंजिन क्रमांक Jc65e72419668 असा आढळला.
सदर मोटारसायकल सिडको पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर येथे ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी दाखल गुन्ह्यातील चोरीची असल्याचे स्पष्ट झाले.
दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली असून पुढील तपास अनुक्रमे पोहेकॉ सानप व पोहेकॉ ठाकरे हे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतीश जाधव, अनंथा डोईफोडे, पोहेका ठाकरे, विजय जाधव, पोका डूरे यांच्या पथकाने केली.