बुलढाणा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने केलेली कारवाई जिव्हारी लागल्याने पाकिस्तानने भारताविरुद्ध हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले. परंतु, भारताने हवेतच सर्व हल्ले हाणून पाडले व चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, सुरू असलेल्या युद्धात भारतीय सेनेचे शूर जवान आपल्या जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्याच्या हेतूने आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात रविवारी सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली होती.

बुलढाणा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने केलेली कारवाई जिव्हारी लागल्याने पाकिस्तानने भारताविरुद्ध हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले. परंतु, भारताने हवेतच सर्व हल्ले हाणून पाडले व चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, सुरू असलेल्या युद्धात भारतीय सेनेचे शूर जवान आपल्या जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्याच्या हेतूने आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात रविवारी सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली होती. यावेळी ‘भारत माता की जय, वंदे मातरम व ‘सूनले पाकिस्तान, बाप तुम्हारा हिंदुस्थान’ अशा विविध संतप्त घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला होता.
शहरातील मातोश्री जनसंपर्क कार्यालयासमोरून तिरंगा रॅली काढण्यात आली. याप्रसंगी आ. संजय गायकवाड यांनी प्रस्ताविकेतून रॅली मागचे आयोजन स्पष्ट केले. ते म्हणाले, भारत -पाकिस्तान युद्धामुळे तनावाची परिस्थिती निर्माण झाली असून आपल्या देशातील असंख्य सैनिक कर्तव्यावर आहेत. एव्हढेच नाही तर, रजेवर आलेले जवान देखील सीमेवर परतत आहे. पाकड्याला धडा शिकवण्यासाठी तसेच आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आल्याचे आ. गायकवाड यांनी सांगितले.
पाकड्यांची खैर नाही : आ. गायकवाड
शनिवारी रात्री यूद्धविराम झाल्याचा संदेश आला, त्यामुळे पूर्वनियोजित तिरंगा रॅलीला शोर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीपूर्व रॅलीचे स्वरूप देण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, पाकड्यांनी पुन्हा कुरापती सुरू ठेवल्याने आता आम्ही पेटवून उठलो आहे. पाकड्यांना आपल्या देशाचे सैनिक त्यांची औकात दाखवल्या शिवाय शांत बसणार नाही, असेही आ. गायकवाड म्हणाले.
‘अशी’ निघाली रॅली
आपल्या दुचाकीसह शहरातील शेकडो तरुण या रॅलीत सहभागी झाले होते. जयस्तंभ चौकातून पुढे बाजार गल्ली, कारंजा चौक, चिखली रोड, सऱ्क्यूलर रोड, संगम चौक मार्गे ही रॅली निघाली होती. यावेळी देशभक्तीवर आधारित विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.