Jalna Crime News: जालन्यात प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्याचा विनयभंग

Jalna Crime News

Jalna Crime News: जिल्ह्यातील मंठा शहर नगर पंचयातमध्ये प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून सोमवार, २६ ऑगस्ट रोजी एक ३८ वर्षीय महिला अधिकारी रुजू झाल्या आहेत. नुकत्याच रुजू झाल्यामुळे त्यांची तात्पुरती निवासव्यवस्था मंठा शहरातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत करण्यात आलेली आहे.

Jalna Crime News
Jalna Crime News

जालना : जिल्ह्यातील मंठा शहर नगर पंचयातमध्ये प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून सोमवार, २६ ऑगस्ट रोजी एक ३८ वर्षीय महिला अधिकारी रुजू झाल्या आहेत. नुकत्याच रुजू झाल्यामुळे त्यांची तात्पुरती निवासव्यवस्था मंठा शहरातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत करण्यात आलेली आहे.
मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी अधिकारी आपल्या खोलीत थांबलेल्या असतांना मद्यधुंद अवस्थेत असलेले दोन इसम त्यांच्या खोलीत घुसले. त्यापैकी एकाने मी भाऊसाहेब गोरे असून, मी डीपीटीसी मेम्बर आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आलो आहोत, असे सांगितले. त्यावेळी या महिला अधिकाऱ्याने मला तुमच्या सहकार्याची गरज नाही, असे म्हणत खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले. तरीही त्या दोघांनी खोलीतून बाहेर न जाता खोलीतच थांबून या महिला अधिकाऱ्यांच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन करून, विनयभंग केला. हे दोघे तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्यांना धमक्या देत अर्वाच्य भाषा वापरली.
याप्रकरणामुळे भयभीत झालेल्या या महिला अधिकाऱ्याने मंगळवारी रात्री तातडीने जालना येथे येऊन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांची भेट घेऊन, आपबित्ती सांगितली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधून तात्काळ गुन्हा नोंदविण्याची सूचना केली. त्यानुसार रात्री उशिरा कदीम जालना पोलीस ठाण्यात या महिला अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भाऊसाहेब गोरे व त्याचा एक साथीदार अशा दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ७४, ३२९ (१), ३ (५) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हा गुन्हा पुढील तपासासाठी मंठा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक भारती हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »