टोनी वरपुडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

परभणी :  भारतीय जनता पक्षाचे नेते विजय वरपुडकर यांचे चिरंजीव ऐश्वर्य उर्फ टोनी वरपुडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर व शहरजिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या उपस्थितीत शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

यावेळी टोनी वरपुडकर यांच्यासोबत गजानन विश्वनाथ जोगदंड, सय्यद अतिक सय्यद अमीर व सुरेश पांचाळ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे शहरात व प्रभाग क्रमांक ५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाला आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमास विजय जामकर, रामेश्वर आवरगंड, माजी नगरसेवक राजू शिंदे, सुरेश काळे, दिपक वारकरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »