छत्रपती संभाजीनगर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सिल्लेखाना परिसरातील काही घरांना सोमवार, 31 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या घटनेत पाच ते सहा घरांना आग लागली असून अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिल्लेखाना येथील अंतर्गत गल्यात असलेल्या काही घरांना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण करीत पाच ते सहा घरांना आपल्या कावेत घेतल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पद्मपुरा अग्निशमन दल, सिडको अग्शिशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. सिल्लेखान्यातील अंतर्गत गल्यांमध्ये असलेल्या घरांना लाग लागली असल्याने अग्निशमन दलाला आग विझविण्यास अडचण येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.