छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविलेल्या जिल्ह्यातील तिसऱ्या आयात उमेदवारानेही उबाठाला जय महाराष्ट्र केला आहे. सुरेश बनकर सिल्लोड, दिनेश परदेशी वैजापूर यांच्यानंतर आता निवडणुकीनंतर सहाच महिन्यात पश्चिम मधून संजय शिरसाठ यांच्या विरूध्द लढलेल्या राजू शिंदे यांनी दलबदल केला आहे. या राजकीय घडामोडीमुळे शिवसेना उबाठात मात्र माजी खा. खैरे विरूध्द विरोधी पक्षनेते दानवे असा वाद पेटला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविलेल्या जिल्ह्यातील तिसऱ्या आयात उमेदवारानेही उबाठाला जय महाराष्ट्र केला आहे. सुरेश बनकर सिल्लोड, दिनेश परदेशी वैजापूर यांच्यानंतर आता निवडणुकीनंतर सहाच महिन्यात पश्चिम मधून संजय शिरसाठ यांच्या विरूध्द लढलेल्या राजू शिंदे यांनी दलबदल केला आहे. या राजकीय घडामोडीमुळे शिवसेना उबाठात मात्र माजी खा. खैरे विरूध्द विरोधी पक्षनेते दानवे असा वाद पेटला आहे.
सहा महिन्यापूव झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाचे पदाधिकारी असलेल्या राजू शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उबाठाच्या तिकिटावर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिदे गटाचे आ. संजय शिरसाठ यांच्या विरूध्द निवडणूक लढवली होती. या लढतीत त्यांचा मोठ्या मतांनी पराभव झाल्यानंतर ते मागील काही दिवसापासून पडद्याआड होते. दोन दिवापूव त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर आपल्या पराभवाचे खापर फोडत शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र करीत असल्याचे घोषीत केले. त्यांच्या या निर्णयानंतर मा.खा.खैरे यांनी दानवे यांच्यावर टिका केली. पक्षाच्या नेत्यांना विश्वासात न घेता टिकीट वाटप केल्याने ही वेळ आल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्ष सोडणारे शिंदे हे एकटे नसून भाजपातून शिवसेनेत येत निवडणूक लढवणारे सिल्लोडचे सुरेश बनकर, वैजापूरचे दिनेश परदेशी यांनीही या पूव शिवसेना उबाठाला जय महाराष्ट्र करीत स्वगृही परतने नसंत केले आहे. त्यामुळे शिवसेना उबाठाने नेमक्या निवडणुकीत आयात केलेल्या उमेदवारांच्या दलबदलूपणामुळे स्थानिक नेतृत्वावर खापर फोडले जात आहे. या राजकीय घडामोडीमुळे शिवसैनिकही नाराजी व्यक्त करीम असून स्थानिक नेत्यांमध्ये सुसंवाद नसल्याने शिवसेनेचा ऱ्हास होत असल्याच्या प्रतिक्रया देत आहेत.
जिल्ह्यात खैरेमुळे सेनेला अपयश

विधासभा निवडणुकीदरम्यान शिवसेना नेते असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी माझा प्रचार न केल्याने माझा पराभव झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात ते फिरलेच नाहीत त्यांच्यामुळेच एकही उमेदवार निवडणून आला नाही. चंद्रकांत खैरे यांनीच उमेदवार पाडले, तसे केले नसेल तर त्यांनी भद्रा मारूतीची शपथ घ्यावी.
राजू शिंदे, माजी उपमहापौर
शिंदेच्या दाडीला केस नाही, दानवे विश्वासात घेत नाही

शिवसेना पक्षप्रममुख उध्दव ठाकरे यांच्यावर टिका करणाऱ्या राजू शिंदे यांना उमेदवारी देवून आंबादास दानवे यांनी चूक केली. पक्ष सोडून पळ काढणाऱ्या घाबरट शिंदेच्या दाडीला केस नाही, पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सूचना देऊनही पक्ष कार्यात विरोधी पक्षनेते दानवे आपल्याला विश्वासात घेत नाही.
चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते
खैरे साहेब जेष्ठ नेते त्यांचा आदर

चंद्रकांत खैरे आमचे जेष्ठ नेते असून त्यांचा आम्ही कायम आदर केला आहे. अशात पक्षाचा कोणताही मोठा कार्यक्रम घेतला नाही. त्यामुळे त्यांचा आरोप बिनबुडाचा वाटतो. आठवडा पंधरा दिवसाला त्यांच्याकडे जात असतो.
आंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते, उबाठा