dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रजासत्ताक दिन परेडसाठी शिवस सुरडकरची निवड

टेंभुर्णी :  येथील मोरेश्वर महाविद्यालयाचा एन.एस.एस. स्वयंसेवक शिवम रामेश्वर सुरडकर याची भारत सरकारच्या वतीने 26 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली आहे. देशातील 100 सर्वोत्तम स्वयंसेवकामध्ये स्थान पटकावून शिवम सुरडकर याने जालना जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

टेंभुर्णी येथील मोरेश्वर महाविद्यालयाचा एन.एस.एस. स्वयंसेवक शिवम सुरडकर याने केंद्र सरकारच्या ‘माय भारत’ पोर्टलवर राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे. ‘स्वच्छता ही सेवा’, ‘एक पेड माँ के नाम’, ‘रस्ता सुरक्षा’ आणि ‘नशामुक्त भारत’ यांसारख्या अभियानांमध्ये त्याने बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच त्याला हा बहुमान प्राप्त झाला आहे. शुभम सुरडकर याची 26 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचे आई, वडील, काका लक्ष्मण सुरडकर, मामा डॉ. पंडित सुरशे, निलेश सुरशे, मोरेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य आदींनी त्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी होणारी परेड शिवम सुरडकर याला विशेष अतिथी म्हणून स्पेशल गॅलरीतुन पाहता येणार असल्याची माहिती त्याचे मामा डॉ. पंडित सुरशे यांनी दिली. तसेच शिवमसह त्याच्यासोबत जाणाऱ्या एका पालकाचा संपूर्ण खर्च हा भारत सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top