अकोलादेव : जाफ्राबाद तालुक्यातील अकोलादेव येथे बुधवारी रात्री वाघोबाचे दर्शन झाले असून एका कारच्या डॅश कॅमेरामध्ये हे दृश्य कैद झाले आहे, तर काळेगाव येथे बिबट्या आढळून आल्याने दहशत पसरली आहे. ही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभाग अर्लट झाले असून वाघ आहे, की बिबट्या याचा शोध घेत आहे.

जाफ्राबाद येथून बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी कार चालक नंदन खेडेकर हे आपल्या कारने देऊळगावराजा येथे जात होते. रात्री १०.५० वाजता राजूर पाटीवर त्यांना वाघ दिसला व हे द्श्य कारच्या डॅश कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे काळेगाव येथे शेतात सोयाबीन काढत असलेले पांडुरंग चव्हाण, शेख अस्लम यांना बिबट्या दिसला. बिबट्याला पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली होती. त्यांनी तत्काळ गावाकडे जाऊन ही माहिती सरपंच वसंत चव्हाण, उपसरपंच शेख वाहेद, तंटामुक्ती अध्यक्ष संजय चव्हाण यांना दिली. तोपर्यंत बिबट्यांनी चार रानडुकरांचा फडशा पाडला होता. काळेगाव कुंभारझरी येथे ऊसाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. तसेच येथे खडकपूर्णा धरण परीक्षेत्रात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. हा बिबट्या येथूनच आला असावा, असा लोकांचा अंदाज आहे. सध्या सोयाबीन सोंगणी, कपाशीला व इतर पिकाला पाणी देण्याची लगबग सुरू आहे. त्यातच या परीसरात बिबट्या वावरत असल्याने महीला, शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत असल्याने शेतीच्या कामांवर परीणाम झाला आहे. त्यामुळे काळेगाव येथील सरपंच वसंतराव चव्हाण यांनी जालना येथील वनविभागाशी संपर्क साधला व लेखी पत्र देऊन बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून काळेगाव येथील बिबट्यांचा शोध घेण्यासाठी जालना वनविभागाचे वनरक्षक संभाजी हटकर यांनी पाहणी केली असता, तो बिबट्याच असून पायांचे ठसे मिळून आले असल्याचे त्यांनी दैनिक महाभुमीशी बोलतांना सांगितले. याबाबत त्यांना अकोलादेव येथील वाघ दिसल्याचे व त्या वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे विचारले असता त्यांनी सांगितले की हा प्राणी वाघ नसून हा बिबट्याच असु शकतो.आपल्याकडे सरासरी वाघ दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. याबाबत भोकरदन येथील वनपरीमंडळ अधीकारी योगेश डोमळे यांना विचारले असता, खरा काय प्रकार आहे. याचा तपास चालु आहे, असे सांगितले.