बुलढाणा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस पोस्को कायद्यांतर्गत तीन वर्षाचा कारावास आणि दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी १५ ऑक्टोबर रोजी सुनावली आहे.

बुलढाणा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस पोस्को कायद्यांतर्गत तीन वर्षाचा कारावास आणि दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी १५ ऑक्टोबर रोजी सुनावली आहे.
प्रशांत विश्वनाथ काळे (२६वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. घटना चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. ३० सप्टेंबर २०२१ रोजी आरोपी प्रशांत काळे व त्याचा एक साथीदार हे पिडितेच्या घराचे कलरिंगचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी प्रशांत काळे याने बेडरुममध्ये वाईट उद्देशाने प्रवेश करुन पीडिता ही एकटी असल्याचे पाहून वाईट उद्देशाने हात जबरदस्तीने पकडला. ‘तु मला खूप आवडते असे त्याने म्हटले. यावेळी पीडिता प्रचंड घाबरून गेली होती. तिने आरोपीच्या हाताला झटका दिला व ओरडली. परंतु, ‘तु जर ओरडली तर, तुला जिवाने मारुन टाकील’ अशी धमकी आरोपीने दिली. परंतु तात्काळ पीडितेच्या घरचे सदस्य धावत आले. आरोपी प्रशांतने संधी साधून तातडीने घरातून पळ काढला. पीडितेचे वडील घरी आल्यानंतर त्यांनी चिखली पोलिसांत धाव घेतली. तक्रारीनुसार आरोपी विरुध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दहा साक्षीदारांची साक्ष
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी यांनी आरोपीस तात्काळ अटक करुन तपासादरम्यान घटनास्थळाचा पंचनामा केला. एकंदरीत तपासाअंती आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप ठेवण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी आरोपीविरुध्द सदर गुन्हा सिध्द होण्याच्या हेतुने एकूण १० साक्षीदार तपासले. पोस्को कायद्यानुसार अत्याचार केला ही बाब न्यायालयासमोर सिध्द झाली.
अॅड. लक्ष्मण भटकर यांचा प्रभावी युक्तिवाद
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील तथा विशेष सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद करुन आरोपीविरुध्द दोष सिध्द केले तर सदर प्रकरणाचा तपास तपासअधिकारी पोउपनि सचिन राजपाल चव्हाण व सपोनि प्रविण तळी यांनी केला होता. कोर्ट पैरवी पो.हे.कॉ. नंदाराम इंगळे यांनी मदत केली.
