जालना : जिल्ह्यांत गुन्हेगारी कृत्ये वाढत असताना अवैधरित्या पिस्तूल बाळगणारी आणि त्याची विक्री करणारी टोळी सक्रिय झालेली आहे. अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला इंदेवाडी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, याबाबत पोलिसांनी केलेल्या चौकशीत एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह तिघांनी पैसे जमवून 40 हजार रुपयांत हे पिस्तूल विकत घेतल्याचे समोर आले आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवार, 19 एप्रिल रोजी शहारातील इंदेवाडी परिसरात यश बाबसाहेब भोर्डे ( रा. काजळा ता. जि. जालना ) याला गावठी पिस्तूल जवळ बाळगताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेले 40 हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि 40 हजार रुपयांचा आयफोन पोलिसांनी जप्त केला असून त्याची चौकशी केली असता त्याने हे पिस्तूल त्याचा मित्र शिवम कैलास जाधव ( 22, रा. नरेश कॉम्प्लेक्स अंबड रोड, जालना ) आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक या तिघांनी 40 हजार रुपये जमवून हे पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सूरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, रमेश राठोड, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, रमेश काळे यांनी केली.
पिस्तूल विकणारे कोण?
जालना शहरात आणि जिल्ह्यात यापूर्वी देखील अवैधरित्या पिस्तूल बाळगणारे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पिस्तूल विक्रीचा व्यवसाय देखील जिल्ह्यांत केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तिघांनी 40 हजार रुपयांत हे पिस्तूल नेमके कोणाकडून विकत घेतले, याबाबत पोलिसांनी माहिती दिलेली नाही. त्यामुळे गावठी पिस्तूल विकणारे नेमके कोण आहेत, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.