dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

BREAKING : लांडग्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार! ; गाय गंभीर 

अंकुश पाटील/भरोसा  : लांडग्याच्या हल्ल्यात एक गोऱ्हा ठार, तर गाय गंभीर जखमी झाली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील भरोसा शिवारात ९ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. 

अंकुश पाटील/भरोसा  : लांडग्याच्या हल्ल्यात एक गोऱ्हा ठार, तर गाय गंभीर जखमी झाली आहे. ही घटना चिखली तालुक्यातील भरोसा शिवारात ९ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. 

भरोसा येथील शेतकरी अशोक संतोष गवते यांचे भरोसा शिवारातील  शेळगाव उतारा रस्त्यावर शेत आहे. त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय सुरू केला होता.    शेतातील गोठ्यात एक गाय, गोऱ्हा आणि म्हैस नेहमीप्रमाणेच चारारापाणी केल्यानंतर ८ ऑगस्टच्या रात्री बांधली होती. परंतु, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी लांडग्याच्या हल्ल्यात गोठ्यातील  गोऱ्हा ठार झाल्याचे  उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच   पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास वानखेडे, वनरक्षक गजानन पोटे, अंचरवाडी बीट भाग दोनचे तलाठी सुरवसे  यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.  वन विभागाचे वनरक्षक गजानन पोटे ,शंकर कोल्हे, गणेश कोल्हे, सचिन गवते यांनी घटनेचा तातडीने पंचनामा केला़

 या घटनेमुळे अल्पभूधारक शेतकरी  अशोक संतोषराव गवते यांचे  जवळपास 14 ते १५ हजार  रुपयांचे नुकसान झाले आहे.    शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top