dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

तालुक्यातील पळशी खुर्द येथे युवकाची चाकूने भोसकून हत्या, गुन्हा दाखल

खामगाव : तालुक्यातील पळशी खुर्द शिवारातील शेतामध्ये एका युवकाचा  इसमाने जुन्या वादाच्या कारणावरून चाकूने भोसकुन खून केल्याची घटना १९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी एका विरुद्ध कोणाचा गुन्हा दाखल केला आहे.

आज दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, लासुरा जहागीर येथील ईश्वर बाबाराव तायडे वय ३९ वर्ष हा मोटरसायकल क्रमांक MH 28 AE 729 ने त्याच्या वडिलांचा जेवणाचा डब्बा शेतात पोहोचून तो ईश्वर तायडे व मुलगी जानवी सह शेतातून घरी जात असताना पळशी खुर्द शिवारातील शिवाजी अंभोरे यांच्या शेता जवळ मागील जुन्या वादाचे कारणावरून भारत झामु यादव रा. लासुरा जहागीर याने ईश्वर तायडे यास काठीने मारहाण करून व चाकूने भोसकून गंभीर जखमी करून जीवनाशी ठार मारले. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी बाबाराव भिकाजी तायडे यांच्या फिर्यादीवरून 

भारत झामू यादव वय अंदाजे  45 रा. लासुरा जहागीर ता. खामगाव याच्या विरुद्ध कलम 103 (1) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा तपास घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top