३२ केंद्रांवर नवोदय प्रवेश परीक्षा; केंद्राबाहेर विद्यार्थी, पालकांची गर्दी

वाशिम : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत जिल्ह्यातील एकूण ३२ परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सकाळी दहापासूनच पालकांसह परीक्षा केंद्रांवर हजेरी लावल्याने अनेक केंद्रांबाहेर पालकांची गर्दी दिसून येत आहे. वाशिम येथील राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय परिसरात सकाळपासूनच गजबजलेले चित्र पाहायला मिळाले.

नवोदय प्रवेश परीक्षा २०२५ साठी जिल्ह्यात तालुकानिहाय परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम व रिसोड या तालुक्यांतील एकूण ३२ शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहे. परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून अनावश्यक गर्दी, वाहतूक अडथळे व गोंधळ टाळण्यासाठी विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. केंद्र परिसरात बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साहित्यावर बंदी तसेच पोलीस व प्रशासनाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने परीक्षेवर लक्ष ठेवण्यात येत असून परीक्षा सुरळीत व शांततेत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »