dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

राज्य नाट्यस्पर्धेत जालन्याचे नाटक सर्वप्रथम: नाट्यांकुर व उत्कर्ष थिएटर्स सलग दुसर्‍या वर्षी अंतिम फेरीत 

जालना : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत नाट्यांकुर व उत्कर्ष थिएटर्स जालना चे ‘ती’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला असून दिग्दर्शन, अभिनयासह एकूण आठ पारितोषिके जिंकली आहेत. 

जालना : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत नाट्यांकुर व उत्कर्ष थिएटर्स जालना चे ‘ती’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला असून दिग्दर्शन, अभिनयासह एकूण आठ पारितोषिके जिंकली आहेत. 

      सतीश लिंगडे लिखित व सुमीत शर्मा दिग्दर्शित ‘ती’ हे नाटक छत्रपती संभाजीनगर केंद्रातून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून सलग दुसर्‍या वर्षी ही कामगिरी त्यांच्या संघाने केली आहे. मागील वर्षी याच संघाचे ‘घोळमटण’ हे नाटक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. या वर्षी किन्नर व तृतीयपंथियांच्या समस्या मांडणार्‍या ‘ती’ या नाटकासाठी उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम सुमीत शर्मा, उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सुमीत शर्मा, अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र सतीश लिंगडे, अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र कपिल रोडगे, उत्कृष्ट रंगभूषा प्रथम वर्षाराणी कोळवले, वेशभूषा दुसरे पारितोषिक संध्या शर्मा, पार्श्वसंगीताचे दुसरे पारितोषिक नीलेश सपकाळ यांनी जिंकले आहे. नेपथ्य मिलिंद दुसे व प्रत्यक्ष संगीत आनंद घुले व आदित्य मुदिराज यांचे होते.

या यशाबद्दल नाट्यांकुर संस्थेचे अध्यक्ष ध. स. जैन, सचिव सुंदर कुँवरपुरिया, जयेश पहाडे, कवी प्रा. डाॅ. दासू वैद्य, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. गणेश अग्निहोत्री, डाॅ. यशवंत सोनुने, उद्योजक सुनील रायठठ्ठा, अरुण अग्रवाल, डाॅ. संजीवनी तडेगावकर, डाॅ. प्रभाकर शेळके आदींनी कौतुक केले आहे.

या कलावंतांच्या भूमिका

या नाटकात सुमीत शर्मा, सतीश लिंगडे, सुंदर कुँवरपुरिया, विनोद जैतमहाल, मिलिंद दुसे, कपिल रोडगे, रेखा चव्हाण, गौरी गिल्डा, सानवी संबरकर, प्रेरणा सराफ, आकाश ओहाळ, गणेश लोखंडे, पवनकुमार खांदे, अमोल सराटे, सोहन भुरेवाल, आनंद घुले या कलावंतांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top