dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अल्पवयीन बालिकेवर बलात्कार प्रकरणात वीस वर्षे सक्त मजुरी आणि 25 हजार दंडाची शिक्षा!

मलकापूर :अल्पवयीन बालिकेवर बलात्कार प्रकरणात आरोपीस वीस वर्षे सक्त मजुरी व 25 हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षाचा आदेश 12 डिसेबर  रोजी विद्यमान विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश पी. बी. जाधव मलकापूर यांनी दिला आहे.

        याबाबत अधिक वृत्त असे की, एक अल्पवयीन बालीका तिचे घरी एकटी असतांना आरोपी संतोष उत्तम मोहीते याने त्या अल्पवयीन बालिकेवर घरात घुसुन अत्याचार केला व सदरची घटना घडत असतांनाच पिडीतेची आई घरी आली व आरोपीचे तावडीतुन पिडीतेची सुटका केली. नंतर मुलीस सोबत घेउन पोस्टे धामणगाव बढे येथे तक्रार दिली. तक्रारीवरून  गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचे गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक आशिष गंदे पोस्टे धामणगाव बढे ता. मोताळा यांनी करून तपासाअंती दोषारोपपत्र विशेष सत्र खटला सत्र न्यायालय मलकापूर येथे दाखल करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top