dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भंगार वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचे घर जळून खाक; सर्व संसार भस्मसात

मलकापूर :  शहरातील शिवाजी नगर परिसरात भंगार गोळा करून आपल्या लहान मुलीसह उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेचे घर अचानक लागलेल्या आगीत पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सदर महिलेचे संसार उघड्यावर आले आहे.

मलकापूर :  शहरातील शिवाजी नगर परिसरात भंगार गोळा करून आपल्या लहान मुलीसह उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेचे घर अचानक लागलेल्या आगीत पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सदर महिलेचे संसार उघड्यावर आले आहे.

      तबसूम अन्सार बी मोहम्मद अन्सार रा. शिवाजी नगर, मंगल कार्यालयाजवळ ही महिला लाकडांचे व कचऱ्याच्या साहित्य जमा करून संसार चालवते. याठिकाणी आपल्या दहा वर्षांच्या मुलीसह राहत होत्या. दरम्यान, त्यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून काही क्षणात भस्मसात झाला. या आगीत घरातील कपडे, ज्वारी, गहू, कडधान्य, स्वयंपाकाची भांडी तसेच इतर सर्व आवश्यक वस्तू जळून खाक झाल्या. हातावर पोट असलेल्या या महिलेचा संसार अक्षरशः रस्त्यावर आला असून पाणी पिण्यासाठीही एक ग्लाससुद्धा शिल्लक नसल्याने त्या हतबल झाल्या आहेत. घटनेनंतर त्यांनी टाहो फोडत हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले होते. दरम्यान, अग्निशमन कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती नगराध्यक्ष अतीक जवारीवाले यांना देत संबंधित महिलेला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. सध्या सर्वस्व गमावलेल्या या महिलेने शासनाकडे मदतीची याचना केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top