केदारखेडा : राज्यातील 17 लाख सरकारी,निमसरकारी,शिक्षक – शिक्षकेत्तर आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी 21 एप्रिलपासून संपावर गेल्यानंतर आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्ग्ात खाजगी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या जवळपास 6 ते 7 हजार कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यावर उपसले आहे.

केदारखेडा : राज्यातील 17 लाख सरकारी,निमसरकारी,शिक्षक – शिक्षकेत्तर आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी 21 एप्रिलपासून संपावर गेल्यानंतर आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्ग्ात खाजगी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या जवळपास 6 ते 7 हजार कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यावर उपसले आहे. ग्रामीण भागातील विविध आरोग्य केंद्रात रक्त संकलन कर्मचारी म्हणून सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे काम आरोग्य विभागाने थांबविल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हा निर्णय मागे घेवून कर्मचाऱ्यांना कामावर पूर्ववत करा अन्यथा आझाद मैदानावर उपोषण करू असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
जालना जिल्हा अरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील जिल्हा, ग्रामीण, प्राथमिक आरोग्य केंद्रात 2017 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जवळपास 6 ते 7 हजार कर्म्ाचारी एच.एल.एल.कंपनीच्या करारानुसार कार्यरत होते. या करारात शासकीय रुग्णालयात रक्त संकलन कर्मचारी म्हणून जबाबदारी पार पडण्यात येत होती. कोराना काळात या कर्मचाऱ्यांनी निस्वार्थपणे सरकारी दवाखान्यातील मेडिकल अधिकारी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून स्वतःच्या व कुंटूांच्या जिवाची पर्वां न करता सेवा दिली आहे. मात्र फ्रुेवारी 2026 मध्ये आरोग्य संचालकांच्या पत्राव्दारे वैद्यकीय अधिकारी यांनी रक्त संकलन कर्मचारी यांना रूग्ण न देण्याचे आदेश दिल्याने या कर्मचाऱ्यांचे काम थांले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील 80 ते 90 आणि राज्यातील एकूण 6 ते 7 हजार कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कुटूंयािंना न्याय देण्यासाठी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून द्यावे अन्यथा मुबईतील आजाद मैदानावर उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
शासनाने आम्हाला न्याय द्यावा
मागील 9 वर्षापासून मी केदारखेडा येथे रक्त संकलन कर्मचारी म्हणून सेवा देत होतो. मात्र आरोग्य संचालकांनी मागील काही दिवसापूव पत्र काढून बजेट नसल्याने कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात येण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी आम्हाला रक्त तपासणी दिली जात नसून आम्ही बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहोत. शासनाने आम्हाला शासकीय सेवेत रूजू करून द्याय द्यावा ही आमची मागणी आहे.
कर्मचारी नसल्याने रूग्णांचे हाल
ग्रामीण भागातील रूग्णांलयांमध्ये रक्त संकलन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला मोफत सेवा मिळत होती. मात्र काही दिवसापासून दवाखान्यात आल्यानंतर कर्मचारी नसल्याने उपचार न घेताच मागे फिरावे लागत आहे. रक्त संकलन कर्मचारी नसल्याने रूग्णांचे खुप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
– रूक्मीनबाई शेळके, केदारखेडा


