सिंदखेड राजा : अल्हाददायक वातावरण, सर्वत्र रोषणाईचा झगमगाट आणि हजारो जिजाऊ प्रेमींच्या उपस्थितीत येथील राजे लखोजीराव जाधव राजवाड्यात व जिजाऊंच्या जन्मस्थळी आज १२ जानेवारीच्या पहाटे महापूजा पार पडली. मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्याहस्ते महापूजा संपन्न झाली.

स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती उत्सवानिमित्त रविवारी पहाटेच, सूर्योदयापूर्वी हजारो जिजाऊ प्रेमींची गर्दी उसळली. सर्वप्रथम, प्रथेनुसार मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच राजे लखोजीराजे जाधव यांची वंशज जाधव कुटुंबीयांनी महापूजा केली. तद्नंतर सर्व जिजाऊ प्रेमींनी जिजाऊ जन्मस्थळी अभिवादन केले. महापूजेनंतर, जिजाऊ पाळणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत आसमंत दुमदुमले. दरम्यान, लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी सर्वप्रथम माध्यमांशी संवाद साधला. सिंदखेड राजा पर्यटन केंद्राचा आंतरराष्ट्रीय पर्यटनात गणना व्हावी, अशी मागणी शासन दरबारी त्यांनी केली.