सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त रविवारी पहाटे पासूनच येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करण्याकरीता हजारो जिजाऊ प्रेमींची गर्दी उसळली आहे. दरम्यान, महापूजेनंतर जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिजाऊ चरणी नतमस्तक झाले.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे, मेहकरचे आ. सिद्धार्थ खरात, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, उबाठा शिवसेनेचे संदीप शेळके आदी मान्यवरांनी अभिवादन केले. दरम्यान, बाल वारकऱ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
अन् आमदार बनले विणेकरी आणि टाळकरी!
बाल वारकऱ्यांच्या मेळ्यात सहभागी होत आ. सिद्धार्थ खरात यांनी हाती विणा घेऊन आणि आ. मनोज कायंदे, ॲड नाझेर काझी यांनी टाळ वाजवत स्फूर्ती गीतांत सहभाग नोंदविला, हे विशेष.