dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ऑनलाइन तलवार मागवून परिसरात दहशत; जालना पोलिसांची कारवाई

जालना :  शहरात अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कदीम जालना पोलिसांनी कठोर पावले उचलत शिवनगर परिसरातील एका युवकाला ताब्यात घेतले. संबंधित युवकाने ऑनलाइन माध्यमातून तलवार मागविल्याची बाब चौकशीत समोर आली असून त्याच्याकडून तलवार, खंजीर आणि धारदार चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कदीम जालना पोलीस ठाण्याचे पथक १५ मे रोजी मध्यरात्री हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहितीदारामार्फत शिवनगर परिसरात एक युवक धारदार शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने सापळा रचत संशयित युवकाला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव यश संतोष जाधव (वय १८, रा. शिवनगर, जुना जालना) असे सांगितले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे शर्टच्या मागील बाजूस लपवून ठेवलेली तलवार, लाकडी मुठ असलेला धारदार चाकू तसेच काळ्या रंगाचा खंजीर आढळून आला. पोलिसांनी सुमारे ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

प्राथमिक तपासात संबंधित तलवार ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. विनापरवाना धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी यश जाधव याच्याविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू व उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ सदा राठोड, पोहेकॉ सचिन चौधरी, पोना बाबा गायकवाड, पोना मतीन शेख आणि पोका इम्रान खान यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ सदा राठोड करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top