अकोला : अकोला मंगरूळपीर मार्गावरच्या दगडपारवा गावाजवळ विटांचा भरधाव ट्रक दुचाकीवर आदळला. या अपघातात ट्रकखाली दबून एकाचा मृत्यू झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अकोला : अकोला मंगरूळपीर मार्गावरच्या दगडपारवा गावाजवळ विटांचा भरधाव ट्रक दुचाकीवर आदळला. या अपघातात ट्रकखाली दबून एकाचा मृत्यू झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ट्रक दगडपारव्यावरून अकोल्याकडे येत असताना दगड पारव्यानजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळून उलटला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुुरु आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.